मंदिर प्रवेशापासुन उंचावलेला अन् फसलेल्या मस्जिद प्रवेशाने खालावलेल्या तृप्ती देसाईंच्या आंदोलनाच्या TRPच्या आलेखाचा राजकारणी व मिडीयाने आपापल्या दृष्टि ने यथायोग्य वापर करुन घेतला.... आपल्या राजकीय व व्यावसायिक फायद्या साठी त्यांनी या आंदोलनाला मोठे केले अन् आता वाऱ्यावर सोडूनही दिले....
या आंदोलना आडून विरोधी पक्षातील राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांना विकासकामांच्या मुद्द्या पासुन विचलित करण्याचे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करण्याचे, आपले अस्तंगत होणारे व बाहेर पडणाऱ्या घोटाळ्यांच्या वास्तवामुळे गटांगळ्या खाणारे अस्तित्व दाखवण्याचे व टिकवण्याचे साधुन घेतले.... तर मिडीयाने आपल्या व्यावसायिक उन्नती साठी या आंदोलनाला वापरले....
हाजी अलीला आपल्या धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी सर्व पक्षीय नेते कट्टरतेने सर्व अस्त्र शस्त्र तयारीनिशी विरोध करावयास उभे ठाकले तरीही त्यांचा विरोध करण्याची त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची आमची ताकद नाही ... अन् काही समजूतदार हिन्दू लोकांनी " अरे जाऊ द्या, पाळतात त्यांना परंपरा पाळु द्या." असे म्हटले तर ते लगेच स्त्री विरोधी, बुरसटलेल्या विचारांचे झालेत !! का ??
मुळात धर्मात सुधारणा करायची तर अशा चौथऱ्यावर जाऊन तेल ओतून कुठल्या समाज सुधारणा घडवणार आहोत ?? का परंपरा मोडून परत अंधश्रद्धांनाच खतपाणी घालणार आहोत ?? गाभाऱ्यात जाऊन इतरांच्या श्रद्धा व आस्थांना तोडूनच आपले ईश्वराशी नाते जुळते का ?? परमेशाशी संधान, तादात्म्य साधता येते का ?? हे प्रश्न आहेतच !!
मात्र या राजकारण्यांच्या व मिडीयाच्या चतूर खेळीला तृप्ती देसाई व आपल्या सारखे स्त्री स्वातंत्र्य व स्त्री हक्काचे पुरस्कर्ते स्त्री अभिनिवेशाच्या झापडांमुळे ओळखु शकले नाहीत असे जाणवते.
............ dp 160505